बदलापूर मध्ये भव्य रक्तदान शिबीर संपन्न, बदलापूर मध्ये भव्य रक्तदान - दैनिक शिवस्वराज्य

बदलापूर मध्ये भव्य रक्तदान शिबीर संपन्न, बदलापूर मध्ये भव्य रक्तदान


प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-

गुरूवार दि. २९.०७.२०२१ करण्यात आले माननीय मुख्यमंत्री, श्री. उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नगरसेवीका, सौ.वीणाताई वहिणी, वामनजी म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच कोरोना महामारीमध्ये रक्तसाठा तुडवडा भासु लागल्यामु्ळे,मा. मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे व आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या रक्तदान शिबीराच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि ठाणे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) मा. श्री. प्रकाशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर प्रभाग क्र. १९ मध्ये आज गुरूवार दि. २९.०७.२०२१ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत श्री साईबाबा मंदिर हाँल, रमेशवाडी, बदलापूर पश्चिम येथे युवा रक्तदात्यांच्या रक्तदानाने संपन्न झाले.
      प्रमुख उद्घाटक मुर्ती मा. श्री. वामनदादा बारकू म्हात्रे शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर तथा माजी नगराध्यक्ष कु.ब.न.प. व प्रमुख उपस्थिती मा.सौ.वीणाताई वामनजी म्हात्रे
शिवसेना नगरसेविका, कु.ब.न.प. मा. श्री. वामनदादा म्हात्रे शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर तथा नगराध्यक्ष, कु.ब.न.प. तसेच शिवसेना नगरसेविका, नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवासैनिक व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  शिबीरास उपस्थित राहून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून रक्तदान केलेल्या सर्व रक्तदांत्यांचे शिवसेना शहर शाखा बदलापूर तर्फे मनःपुर्वक आभार व हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads