सुवर्णमहोत्सवी शाळेतील विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकांनी केला सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

सुवर्णमहोत्सवी शाळेतील विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकांनी केला सत्कार


मंगेश पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी :-

धरणगाव - येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगांवचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला. 
              कु.दिपाली दिलीप नेतकर ही शाळेतून ९४.२० % गुण संपादन करून प्रथम आली. कु.वैशाली गुलाब माळी ही द्वितीय क्रमांकाने ९३.८० % , कु.रूपाली गोविंदा भोई ही तृतीय क्रमांकाने ९३ % , तर चतुर्थ कु. दिपाली राजेंद्र भोई ९२ .८० % मिळवुन यश संपादन केले. इतर सर्व विद्यार्थांनी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. 
               प्रथम, द्वितीय व तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थीनींचा व  पालकांचा शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने  मनस्वी अभिनंदन करण्यात आले. 
          याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे.एस. पवार ज्येष्ठ शिक्षिका एम.के. कापडणे, इ.१० वी चे  वर्गशिक्षक पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads