राजकीय
कोणी कोणाशीही हातमिळवणी करु द्या, शिवसेना सक्षमच : शंभूराजे देसाई
प्रतिनिधी बालाजी गोरे :-
कोणी कोणालाही भेटू द्या, की हातमिळवणी करु द्या, शिवसेना सर्वार्थाने सक्षम आहे, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.येथील कल्याण नगरातील आयएमएच्या सभागृहात आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानानिमित्त गृहराज्यमंत्री देसाई हे परभणीत दाखल झाले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना देसाई यांनी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी संघटना आहे, असे स्पष्ट करीत राज्यात आजही शिवसेना सर्वार्थाने सक्षम आहे, असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व नरेंद्र मोदी यांची भेट राजकीय अर्थाने पाहिली जात आहे. त्याचबरोबर भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातही युतीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेस धोका संभावू शकतो का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला तेंव्हा देसाई यांनी राज्यात कोणी कोणाशीही युती केली काय अन हात मिळवणी केली तरी शिवसेनेवर फारसा फरक पडणार नाही, असे म्हटले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखखाली महाविकास आघाडी सरकार कार्यक्षमपणे कार्य करत आहे. त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही, असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार सौ. मीराताई रेंगे पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, महिला आघाडीच्या सखूबाई लटपटे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा