महाराष्ट्र
खोपोली नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका उर्मिला रवींद्र देवकर यांच्याकडून स्वइच्छेने पूरग्रस्तांना एक हात मदतीचा
सुधागड /कोंडगाव --- राम तुपे
एक हात कर्तव्याचा अपील करत खोपोली नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ उर्मिला रवींद्र देवकर यांनी महाड येथील पूरग्रस्त तलिये गावात जाऊन जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे 50 किट(1 किट -- तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, बिस्कीट, दाल, फरसाण पाकिटे, पाणी बॉटल), ई चे वाटप करत एक हात कर्तव्याचा ही मोहीम राबवली. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी, उभे राहण्यासाठी, सहवेदना व्यक्त होण्यासाठी, माणुसकी जपण्यासाठी चला साथ देऊया अण माणूस बनवूया. असे सौ उर्मिला रवींद्र देवकर यांच्या आवाहनास सोबत असणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेली त्यांच्यासोबत सुदाम शिंदे ,डॉक्टर खराडे ,अरुण जाधव, गणेश नागे, नितेश देवकर, तेजस मोरे इत्यादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा