महाराष्ट्र
डी आर हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
नंदुरबार प्रतिनिधी दिनेश वाडेकर :-
नंदुरबार : नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक नारायण भदाणे,तर प्रमुख वक्ते शाळेचे पर्यवेक्षक श्रीराम मोडक होते. व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष चे शेखर कोतवाल होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या निमित्ताने ऑनलाईन व ऑफलाइन स्वरुपात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, घेण्यात आल्या .पाचवी ते सहावी च्या गटात सुंदर हस्ताक्षर व घोषवाक्य स्पर्धेत नक्ष सामुद्रे, वैभव गावित ,मनीष राजपूत, वेद मंडले ,मधुर बागुल, वेदांत पाटील, विनीत शेवाळे, मोहित बावा ,अर्णव गावित, हर्षवर्धन शिंदे ,मयुर गवते, कुणाल पाटील, गुणवंत गिरासे, तनिष वळवी,दुर्गेश पाटील, तसेच सातवी आठवी च्या वक्तृत्व स्पर्धेत स्मित बोरसे, गौरव भावसार, मोहित मराठे, दुर्गेश गाभणे, नववी-दहावीच्या वक्तृत्व स्पर्धेत कमलेश जोशी, प्रनिल सोनवणे, पार्थ फुलंब्रीकर,जयदीप गिरासे,आदी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळविले. वरील स्पर्धेचे परीक्षण सीमा मोडक, राजश्री गायकवाड, सुनीता बागूल,प्रशांत जानि, कविता भंडारी यांनी केले.विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत पेंढारकर प्रास्ताविक राजेंद्र लांडगे आभार अशोक वसईकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख हेमंत खैरणार, राहुल पाटील,दिनेश वाडेकर,देवेंद्र कुलकर्णी, निलेश गावीत,चंद्रशेखर पाटील ,मनोज परुळेकर आदींनी परिश्रम घेतले.या वेळेस शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा