महाराष्ट्र
टाकळी नाकाबंदी पॉंईट येथे १५ लाख ८ हजार रुपयांचागुटखा वाहनासह जप्त; मंद्रूप पोलीसांची कामगिरी
समीर शेख सोलापूर जिल्हा
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी अंतरराज्य नाकाबंदी पॉंईट येथे गुरुवार,दिनांक २ सप्टेबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करताना मंद्रूप पोलीसांना कर्नाटक राज्यातुन एक टेम्पो त्याचा क्रमांक एम एच २१ बी एच ३९२९ हा सुंगधी तबाखु गुटखा सदृश पान मसाला घेवुन प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
संशयीत वाहन ताब्यात घेवुन तपासणी केली असता खालील प्रमाणे गुटखा सदृश माल
मिळुन आला.त्यात ७१ हजार ५०० रुपयांचा हिरा पान मसाला सुंगधी सुपारी ५० पोते,३ लाख,८५ हजार रुपयांचे रॉयल तबांखू २५ पोते,६ हजार ४०० रुपयांचे हॉट प्रिमिअम पान मसाला ५० पाकिट,१६०० रुपयांचे प्रिमिअम चेव्हींग तबाखु ५० पाकिट,४ लाख रुपयांचा एक अशोक लेलँड कपंनीचा टेम्पो असा एकूण १५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर बाबत मंद्रुप पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३२८ व अन्न सुरक्षा मानके अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक अमितकुमार करपे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत पाटील,सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे,सहायक पोलीस फौजदार निगेबान,पोलीस नाईक विशाल गायकवाड,शितल उघडे,पोलीस शिपाई चंद्रकात सुतार,पोलीस अंमलदार संदीप काळे यांनी बजावली आहे.
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा