महाराष्ट्र
जामनेर तालुका संजय निराधार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी प्रदिप भाऊ लोढा यांची नियुक्ती जागृत अपंग सघटनेच्या वतीने सत्कार व अभिनंदन
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे जागृत अपंग संघटने कडून जामनेर तालुका संजय गांधी निराधार समितीचे प्रदीप भाऊ लोढा यांची नियुक्ती करण्यात आली असून आज रोजी त्यांचे जागृत अपंग संघटने मार्फत स्वागत करण्यात आले.
प्रदिप भाऊ लोढा यांनी सांगितले की तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तत्पर राहिल आणि प्रत्येक अपंग बाधव,तसेच विधवा महिला, वय वृद्ध नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन प्रदिप भाऊ लोढा यांनी सांगितले.
या ठिकाणी स्वागत करताना जागृत अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर ,उपाध्यक्ष गणेश साळुंखे, सचिव युवराज मगरे, शहर अध्यक्ष मोहन सुरवाडे, तालुका अध्यक्ष अलियार भाई खान,सहसचिव दरबारसिंग चौव्हाण, निलेश सिसोदे , माजी सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष कैलास कोळी,महिला तालुका अध्यक्षां आशाबाई पाटील,
विलास खरात उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा