राज्यस्तरीय रक्षाबंधन विशेष स्पर्धेत रविना यादव प्रथम - दैनिक शिवस्वराज्य

राज्यस्तरीय रक्षाबंधन विशेष स्पर्धेत रविना यादव प्रथम



स्वयंसिध्दा महिला मंडळ लातूर, यांची नऊ वर्षाची अखंड परंपरा असलेली राज्यस्तरीय रक्षाबंधन विशेष विविध स्पर्धेमध्ये कु.रविना आनंदकुमार यादव ,रा.वडूज ,ता .खटाव .हिने एकूण पंचावन्न स्पर्धकांना टक्कर देत सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केला.याबद्दल स्वयंसिध्दा महिला मंडळ लातूर, यांच्यावतीने सन्मानचिन्ह सन्मानपत्र व विशेष बक्षिस देऊन तिचा सन्मान करण्यात आला..
 " रक्षाबंधन विशेष लेख "या विषयावर रविना हिने सुलेखन केले.बहिण भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधन सण व यातच वाढत जाणारा हा कोरोना, लॉकडाऊन ,आणि त्याचे निर्बंध ,या मधून आपली व इतरांची काळजी घेत आपण कशा प्रकारे हा रक्षाबंधन साजरा करु शकतो ,यावर उत्तम प्रकारे  लेखन करुन सविस्तरपणे रविनाने आपल्या लेखनीतून मांडले .
 रविना ही वडूज मधील दादासाहेब जोतिराम गोडसे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सध्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.   संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब गोडसे (आण्णा),  कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.पाटील सर , तसेच
उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे (बाबा),तसेच प्रा.डॉ.सविता गिरे मँडम ,व प्रा.डॉ.क्षितिज धुमाळ व आदी प्राध्यापकांचे तिला मार्गदर्शन  लाभले.तीच्या या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला.रविना यादव ही वडूज आगारातील कर्तव्यदक्ष कर्मचारी, व कामगार सेनेचे जेष्ट नेते आप्पासाहेब यादव यांची सुकन्या आहे.यापूर्वी ही रविना यादव हिने अनेक राज्यस्तरीय बक्षिसे, व साहित्य क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. रक्षाबंधन विशेष राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन रविना यादव हिने पालक,व महाविद्यायाचे तसेच तालुक्याचे नावलौकिक वाढवल्याबध्दल तीचे सर्वत्र गोड कौतुक होत आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads