रस्त्यांमुळे देशाच्या विकासाला गती मिळालीः आ. देशमुख भंडाकरठे-संगमेश्‍वर नगर येथील रस्त्याचे भूमिपूजन - दैनिक शिवस्वराज्य

रस्त्यांमुळे देशाच्या विकासाला गती मिळालीः आ. देशमुख भंडाकरठे-संगमेश्‍वर नगर येथील रस्त्याचे भूमिपूजन


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
  सोलापूर दि.२ :देशातील रस्ते आता मजबूत होत आहेत. यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. रस्ते हे विकासाच्या वाहिन्या असून ज्या गावाचा रस्ता चांगला त्या गावाचा विकास अधिक होते.   असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केेले. भंडाकरठे ते संगमेश्‍वर नगर येथील रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, जि.प.सदस्या प्रभावती पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, भंडारकवठेचे सरपंच चिदानंद कोटगोंडे आदींची उपस्थिती होती.    या रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 43 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.   यावेळी अण्णाराव बाराचारी, पंचायत समितीचे सदस्य महादेव कमळे, मळसिध्द मुगळे यांनीही  मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बाराचारे यांनी कै. देवकते यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य शशिकांत दुपारगुडे, गौरीशंकर मेंडगुदले, सचिन पाटील, हणमंत पुजारी, मल्लेशी कस्तुरे, उपअभियंता महेंद्र उंबरजे,  मोहन अलाट आदी उपस्थित होते. प्रास्ताविक हणमंत कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन यतिन शहा यांनी केले.
 
  देवकते यांच्या स्मारकासाठी सर्वांचे सहकार्य हवे
      माजी मंत्री तथा आमदार कै.आनंदराव देवकते यांचे राजूर या गावी स्मारक आणि   पुतळा व्हावा, अशी आपली इच्छा आहे. त्या समितीचा मी अध्यक्ष आहे. पण या कामाला कोणाचेही सहकार्य नाही. माझी जर कोणाला अडचण होत असेल तर आपण मागे सरकायला तयार आहोत पण ज्यांनी  25 वर्षे या तालुक्याची सेवा केली आहे त्यांचे स्मारक  व्हायलाच पाहिजे, असे आ. देशमुख म्हणाले.    
 

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads