सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही : देवेंद्र फडणवीस - दैनिक शिवस्वराज्य

सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही : देवेंद्र फडणवीस


काल शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार राजकीय प्रहार केले. विशेष म्हणजे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने (Fadnavis On MahaVikas Aghadi) पाडून दाखवावंच असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

आज सकाळी त्यांनी मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, 'उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सारखा ' सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा' चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads