मंद्रुप जिल्हा परिषद गटातून महमद शेख उतरणार राजकीय आखाड्यात... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रुप जिल्हा परिषद गटातून महमद शेख उतरणार राजकीय आखाड्यात...



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप जिल्हा परिषद गट व गण असलेल्या  भागातून मंद्रुप येथील उच्चशिक्षित तरुण व पत्रकार महमद शेख यंदा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे.

महमद शेख हे उच्चशिक्षित असून सर्वसामान्य परिस्थिती असणारे असून त्यांची संघर्ष करण्याची क्षमता व आत्मविश्वासाचा आवाका मोठा आहे.मागील पाच वर्षांपासून ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांशी तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.२४ मे २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी समाजातील विविध विषयांवर आपले रोखठोक मत मांडणारे व मंद्रुपच्या समस्यां घेवून ग्रामपंचायत प्रशासनाला काम करण्यासाठी भाग पाडणारा एक सच्चा समाजसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून अल्लाउद्दीन शेख यांच्या मातोश्री यांना निवडणूकीसाठी उमेदवारी दिली होती.काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता.परंतू निवडणूकीनंतर अल्लाउद्दीन शेख भाजपमध्ये प्रवेश करत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पँनलमधून सदस्य झाले व उपसरपंच झाले.त्यामुळे यावेळी ते भाजपकडून उमेदवारी मागणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता मंद्रुपमध्ये महमद शेख यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads