PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती देत, या कार्यक्रमांपूर्वी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.
आज गुरु नानक यांची जयंती असून, त्यांची जयंती प्रकाश पर्व आणि गुरू पर्व म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचन योजनेचं लोकार्पण करणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
सिंचन योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पंतप्रधान झाशीला भेट देणार आहे. सायंकाळी होणाऱ्या राष्ट्र रक्षा समर्पण पर्व कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहे.
मोदी काय बोलणार?
पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान कोणत्या मुद्द्यावर देशाला संबोधित करणार याकडे देशवासियांचं लक्ष असणार आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देशाला उद्देश केलेल्या भाषणातून देत आहेत. त्याचबरोबर कोरोनाविषयक काळजी घेण्यासंदर्भातही त्यांनी अनेकवेळा देशाला संबोधित केलेलं आहे.
दिवाळीपूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं होतं. भारताने 100 कोटी डोसचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने मोदींनी देशवासियांनी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना विषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा