आजचे राशिभविष्य दि.08/12/2021
मेष –
आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावहारिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल.
वृषभ –
सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन –
संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांची मतभेद होतील. संयमाने वागा. नियोजित कामांत अडचणी येतील.
कर्क –
सामंजस्याने प्रश्न सोडवाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल.
सिंह –
शत्रूंवर मात कराल. नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल. भागीदारीमधील व्यवसायात नफा होईल. आनंददायी दिवस.
कन्या –
प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. मनःस्ताप होण्याची शक्यता.
तूळ-
घर, जमिनींच्या कामांत अडचणी येतील. नावलौकिक सांभाळावे लागेल. वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. वादविवादापासून दूर राहावे.
वृश्चिक-
आत्मविश्वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
धनु –
वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल. शब्द मागे घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
मकर –
आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. कृतज्ञता व्यक्त कराल. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. मनपसंद खरेदी कराल.
कुंभ –
आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज. उत्तरार्धात सुवार्ता ऐकायला मिळेल. मेजवानीचे योग संभवतात.
मीन –
मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा