सक्तीचे लसीकरण तात्काळ बंद करा. बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन... - दैनिक शिवस्वराज्य

सक्तीचे लसीकरण तात्काळ बंद करा. बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन...

सक्तीचे लसीकरण तात्काळ बंद करा. , बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन...

चिखली (विशेष प्रतिनिधी) :- विविध क्षेत्रात लसीकरणासाठी लादलेले सर्व बेकायदा निर्बंध तात्काळ स्थगित करण्यात यावे, यासाठी सुधीर सोनटक्के प्रदेश उपाध्यक्ष-BBM यांच्या नेतृत्वात मा.तहसिलदार साहेब चिखली यांना निवेदन देण्यात आले.



महाराष्ट्र राज्यात कथीत कोरोणा महामारिच्या अनुषंगाने राज्यात सर्वच नागरिकांना मा.अतिरिक्त संचालक , आरोग्य सेवा कल्याण माता-बाल संगोपन व शालेय आरोग्य कुटुंब कल्याण व जिल्हा प्रशासनाच्या तोंडी आदेशानुसार कोराणा विरोधी लस घेण्यासाठी असंवैधानीक प्रकारे सक्ती केल्या जात आहे ,या आदेशान्वये सर्व सामान्य नागरिकांच्या विविध सोयी_सुविधा सेवा,योजना बंद करण्याचे निर्देश दिले जात आहेत उदा.राशन बंद करणे , सार्वजनिक कार्यालयात प्रवेश बंद करणे व प्रवास बंद करणे , शासकीय कामासाठी दाखले न देणे , विद्यार्थ्यांना शाळा काॅलेज मध्ये तथा परिक्षेला बसू न देणे आशा अनेक प्रकारच्या बंदी केल्याबातच्या वेगवेगळे जिल्ह्यास्तरावर आदेश काढले जात आहेत केंद्र, राज्य , जिल्हा शासन व प्रशासनास माहित आहे कि शासन पत्रकानुसार मा.सर्वोच्च न्यायालय व भारत देशातील विविध मा.उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालानुसार कोरोणा लस , नागरिकांना घेणे न घेणे हि देशातील नागरिकांची ऐच्छिक बाब आहे .

केंद्र, राज्य, जिल्हा,प्रसासनास माहिती आहे कि भारतातील वेगवेगळ्या राज्यात कोरोणा लसिकरण मोहीमेच्या दरम्यान काहि कर्मचारी व सर्व सामान्य नागरिक लस घेतल्यानंतर मृत्यू पावले आहेत या बाबतचे वृत्त अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे ,तसेच जे नागरिक वेगवेगळ्या दिर्घ आजाराने त्रस्त आहेत त्यांच्या प्रकृतीवर सुद्धा लस घेतल्यानंतर विपरीत परिणाम झाला आहे, आशायाचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टी दिले , तसेच तात्काळ सक्तीचे लसीकरण थांबवले नाही तर तिव्र राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला , हे निवेदन गौतम मघाडे चिखली तालुका अध्यक्ष , बहुजन मुक्ती पार्टी , रवी मगर जिल्हा अध्यक्ष-BBM ,बबनराव आराख , तालुका सचिव_BMP, आशाबाई कस्तुरे , राहुल मघाडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads