राष्ट्रीय लोकअदालतीचे अकरा डिसेंबरला आयोजन...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर,दि.03 : राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे होणारी राष्ट्रीय लोकअदालत 11 डिसेंबर 2021 होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. आर. मोकाशी यांनी दिली आहे.
11 डिसेंबर 2021 रोजी शहर व जिल्हा, तालुक्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र, बँक वसुली, कलम 138 एनआय ॲक्ट, अपघात न्यायाधिकरण, कामगार वाद, वीज, पाणी देयक, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त यामधील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांवर तडजोडीने वाद मिटविण्यात येणार आहेत. लोकअदालत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. लोकअदालतीमध्ये येणाऱ्या पक्षकारांनी कोरोनासंदर्भात शासनाने दिलेले निर्देश पाळावेत, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे, असेही श्री. मोकाशी यांनी सांगितले आहे.
जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. मोकाशी यांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा