चिखली पंचायत समिती मध्ये आज सकाळी सात वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले - दैनिक शिवस्वराज्य

चिखली पंचायत समिती मध्ये आज सकाळी सात वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांना वाळीत टाकल्यावर हिंदु ब्राम्हण व मुस्लिम समाजाचा रोष स्वीकारून आपल्या घरी आश्रय दिला व सावित्रीमाई फुले यांच्या सह मुस्लिम समाजात पहिली शिक्षिका म्हणून मान मिळविणाऱ्या फातिमा बी शेख यांना योग्य प्रसिद्धी अभावी इतिहासात जागा मिळण्यास खुप दिवस लागेल, आजही शासकीय कार्यक्रमाच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण अभिवादन दिवस फातिमा बी शेख जयंती पुण्यतिथी विषयी नोंद नसल्याने शासकीय कार्यालयात दखल घेतली जात नाही ही निंदनीय बाब आहे.

प्रशासनाने या महापुरुषांची योग्य ती दखल घेऊन  शासकीय कार्यक्रमाच्या यादीत नोंद घेऊन त्यांचा केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला सन्मान द्यावा

इमरान शेख 

उड्डाण फाऊंडेशन चिखली

सर्व भारतात ६डिसेंबर स्मृतिदिन म्हनून साजरा करण्यात येतो या दिवशी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकर वादी नागरीक शाळा, विद्यालये आस्थापना तसेच शासकीय कार्यालयात महापरिनिर्वाण दिवस आयोजित करून अभिवादन करतात. चिखली पंचायत समिती मध्ये आज सकाळी सात वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads