राजकीय
इंदिरानगर मंद्रुप येथे पोटनिवडणुकीसाठी दोन्ही अर्ज मंजूर, जनक्रांतीच्या उमेदवाराला बिनविरोध करायला हवे होते - नागरिकांची प्रतिक्रिया बीजेपी पुरस्कृत पँनलने उमेदवारी घोषित केल्यामुळे लागली निवडणूक...
मंद्रुप ग्रामविकास पँनलचे आधारस्तंभ माजी सरपंच सूर्यकांत ख्याडे यांचा महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवार पत्रकार अल्ताफ शेख यांच्या मातोश्री सौ.रियाना गफूर शेख यांना जाहिर पाठिंबा......
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : सद्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून ६ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.मंद्रुप येथील इंदिरानगर येथील वार्ड.क्र.२ मध्ये जनक्रांती पँनलच्या एकमेव सदस्या स्व.तंगेव्वा काळे
यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाले आहे. या जागेवर मंद्रुप इंदिरानगर येथील दोन अर्ज दाखल झाल्यामुळे ७ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होती.यामध्ये बीजेपी पुरस्कृत पँनलतर्फे सौ.पल्लवी पिराप्पा डोगे व मंद्रुप जनक्रांती परिवर्तन विकास पँनलकडून सौ.रियाना गफूर शेख यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याने निवडणूक लागणार हे निश्चित झाले आहे.या जनक्रांती पँनलच्या उमेदवारला प्रहार जनशक्ती पक्ष, आखिल भारतीय किसान सभा, व महाविकास आघाडी व माजी सरपंच सुर्यकांत ख्याडे यांनी जाहीर पाठींबा दिला असल्याने निवडणूक चुरशीने होणार असल्याची चर्चा सद्या इंदिरानगर परिसरात आहे. २०१७ च्या निवडणुकीत विचारांशी तडजोड न करता अनेकांनी दबाव तंत्राचा वापर करुन सुद्धा स्व.तंगेव्वा काळे यांनी पँनल बदलले नाही. व निवडणुकी नंतरही ते पँनलच्या हिशोबानेच त्यांचा पाठिंबा उपसरपंच निवडणुकीत चालू सत्ताधारी पँनलला दिले होते. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी दुर्दैवाने ग्रा.सदस्या स्व.तंगेव्वा काळे यांचा मृत्यू झाला. यामुळे या रिक्त झालेल्या जागेत पोटनिवडणूक लागली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा