द. सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन.. - दैनिक शिवस्वराज्य

द. सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
                 या कार्यक्रमाचे उद्घाटन कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ संगिता नलावडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
                ओमायक्राॅन चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव यांच्या वतीने  सोमवारी मनगोळी येथे एकदिवसीय कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान जवळपास 85 लोकांनी 1 ला 2 दुसरा कोविड लसीकरणाचे डोस घेतले असुन उर्वरित राहिलेले लसीकरण शिबिराचे आयोजन गुरुवारी होणार असल्याची माहिती कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ संगिता नलावडे मॅडम यांनी सांगितले.
या लसीकरण शिबिरा संदर्भात अधिक माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका गंगापुरे KN यांनी लोकप्रधान न्यूज चैनल शी बोलताना दिली.
यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ संगिता नलावडे मॅडम यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अमोल खंडाळे,सुपरवाईजर YP कांबळे, सुपरवायझर धुळम,
सुपरवायझर तुपे मॅडम,आरोग्य सेविका कमल कांबळे आरोग्य सेविका गंगापूरे KN,आरोग्य सेवक सोनकांबळे,
गावच्या अंगणवाडी सेविका पोपटबाई घंटे,अंगणवाडी सेविका तेजश्री गायकवाड,आशा वर्कर ललिता ताई पाटील आदी मंडळी उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads