महाराष्ट्र
गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या पदोन्नती बद्दल डी.एम.ग्रुप गुंजेगावचे प्रमुख विकास पाटील व गुंजेगाव,येळेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांची पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे डी.एम.ग्रुप गुंजेगावचे प्रमुख विकास पाटील व गुंजेगाव आणि येळेगाव ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेतील कार्यालयात सोमवारी यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
गटविकास अधिकारी राहुल देसाई यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) पदी नियुक्ती देण्यात आली आहे.राहुल देसाई यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने दक्षिण सोलापूर तालुक्यात काम केले होते.
यावेळी डी.एम.ग्रुप गुंजेगावचे प्रमुख विकास पाटील,येळेगावचे सरपंच संजीवकुमार लोणारी,गुंजेगावचे उपसरपंंच तुकाराम भडकुंबे,कुंडलिक जाधव,दत्ता पवार,अमीर शेख,नागेश गुंड,माऊली सुतार आणि गुंजेगाव,येळेगावातील ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा