पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथील आणखी एका तरुणाने महावितरण च्या वीज तोडणीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.. - दैनिक शिवस्वराज्य

पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथील आणखी एका तरुणाने महावितरण च्या वीज तोडणीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न..


सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा

 पंढरपूर:- गेल्या एक वर्षापासून सातत्याने होणारी वीज तोडणीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत उन्हाळ्यात पाणी असताना डोळ्यासमोर शेतातील उभी पिके जळत आहेत महावितरणचे अधिकारी बेकायदेशीरपणे सब स्टेशन मधून लाईट बंद करून बिल भरले तरच लाईट सुरु होईल अशी तंबी शेतकऱ्यांना देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आमदार-खासदार राजकीय नेत्यांना अनेक वेळा फोन करून कोणीही वीज तोडणी बाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही त्यामुळे या सर्व गोष्टींना कंटाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन घोडके यांनी रोहित्र वर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावातील तरुण व शेतकरी बांधव तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाहुबली साळवे यांनी घोडके यांना .विनंती करून त्यांना खाली उतरविले आहे. व पोलीस डिपार्टमेंट हवालदार माळी व इतर अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून वीज जोडणी बाबत चर्चा केली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads