सावधान : सायबर चोरट्यांकडून तरूणांची लाखोंची फसवणूक - दैनिक शिवस्वराज्य

सावधान : सायबर चोरट्यांकडून तरूणांची लाखोंची फसवणूक

मोबाइल केवायसी अपडेट करण्यासह परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणांना दोन लाखांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. परदेशात नोकरी लावण्यासाठी दिड लाख रूपये आणि केवायसी अपडेट करण्यासाठा 43 हजार अशी फसवणूक केली आहे.
मोबाईलचे केवायसी अपडेट नसल्यामुळे सेवा बंद होण्याचा मेजेस होण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने तरूणाची फसवणूक केली. याप्रकरणी विशाल काकडे (वय 28, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्हीआयपी कंपनीतून बोलत असून दरवर्षीप्रमाणे केवायसी अपडेटसाठी करावे लागेल असे सांगत सायबर चोरट्याने प्ले-स्टोअरवर एनी-डेस्क ऑप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यांच्या बँकखात्यावरून 43 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी चाकणमधील तरुणाला सिंगापूर येथे नोकरी लावण्याचे आमिषाने एक लाख 53 हजारांची फसवणूक करण्यात आली. नोकरी न लावता फसवणूक केली. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक मंजुषा मुळुक अधिक तपास करत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads