कोकणात ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी - दैनिक शिवस्वराज्य

कोकणात ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी


जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Jilhadhikari Karyalay Sindhudurg Collector Office Sindhudurg) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 असणार आहे. 
या पदांसाठी भरती प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) सहायक प्रकल्प व्यवस्थापक (Assistant Project Manager) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/ MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 
सहायक प्रकल्प व्यवस्थापक (Assistant Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 
इतका मिळणार पगार प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना सहायक प्रकल्प व्यवस्थापक (Assistant Project Manager) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 29,200/- - 92,300/- रुपये प्रतिमहिना 
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 
अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads