क्रीडा
नॅशनल एल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वडूजच्या कराटे स्पोर्टचे सुयश
वडूज प्रतिनिधी / रविना यादव.
पुणे येथे झालेल्या नॅशनल एल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वडूज येथील कराटे स्पोर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले. स्कूलचे यशस्वी विद्यार्थी व कंसात त्यांना मिळालेली पदके - अनिस मुल्ला, अरबाज शेख, वेदिका भेंडे, ऋतुजा धुमाळ, ( सुवर्णपदक ) अश्रफ मुल्ला, युगांत भोकरे, अरमान डांगे, ओम भोसले, जय गलंडे, ( रौप्यपदक ) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हरणाई सूतगिरीणीचे संस्थापक अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मनिषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉ महेश गुरव, नगरसेवक अभय देशमुख, खजिनदार इम्तियाज बागवान, डॉ संतोष गोडसे, निलेश घार्गे - देशमुख, बाबा फडतरे, एल्बो बॉक्सिंगचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान बागवान आदिंनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अमिन मुल्ला, प्रताप गुजले, यांचे मार्गदर्शन लाभले. अशोक चव्हाण, महेंद्र कुंभार, अरबाज शेख, रोहित माने, श्रुती घार्गे यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले.
फोटो
वडूज - येथील नॅशनल एल्बो बॉाक्सिंग स्पर्धेत यश मिळविणारे कराटे स्पोर्टस्कूलचे विद्यार्थी
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा