उपसरपंच तुकाराम भडकुंबे व गुंजेगाव ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश...... गुंजेगाव येथे लाल परी चे आगमन.. - दैनिक शिवस्वराज्य

उपसरपंच तुकाराम भडकुंबे व गुंजेगाव ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश...... गुंजेगाव येथे लाल परी चे आगमन..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
 सोलापूर : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना शहराशी जोडणारी ग्रामीण भागातील प्रत्येकाची जीवनवाहिनी अर्थात एसटीची वाहतूक सेवा होय. कोरोना महामारीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन या घटनेमुळे बंद असलेली गुंजेगाव सोलापूर एसटी बसची सेवा तत्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी गुंजेगाव ग्रामस्थांनी शुक्रवार दि. ६ मे रोजी एसटी महामंडळाकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन एसटी महामंडळ सोलापूर यांनी आज दिनांक ८ मे रोजी एसटीची वाहतूक सेवा तत्काळ सुरु केली.

गुंजेगावचे उपसरपंच, सरपंच तुकाराम भडकुंबे आणि सोलापूर जिल्हा लोकसंख्या विभाग सरचिटणीस अकबर शेख यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. यावेळी उपसरपंच तुकाराम भडकुंबे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, शंकर पवार, कुंडलिक जाधव, किरण आठवले, सत्यवान भडकुंबे, DM ग्रुपचे अध्यक्ष विकास पाटील, सुभाष पवार (तंटामुक्त अध्यक्ष), जगन्नाथ पाटील, कल्याणराव पाटील, दत्ता पवार, अमीर शेख, रामचंद्र गोसावी (मेजर), समाधान जाधव, सोमनाथ पाटील, सतीश जाधव, आयुब मुजावर, वामन अवताडे, दत्ता सुतार, विकास भडकुंबे, भारत भडकुंबे, गौतम आठवले, बाळू आठवले, सिद्धनाथ पवार, माऊली सुतार, तानाजी आठवले, शिवपल शिवाप्पा लोणारी यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी गुंजेगाव ग्रामस्थांच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांनी दैनिक शिवस्वराज्य न्यूजचे व पत्रकार समीर शेख यांचे धन्यवाद मानले व न्यूज लावल्याने यशस्वी पत्रकार समीर शेख यांचे आभार मानले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads