कै.नागराज (मारुती) त्रिंबक पाटील(मा.सरपंच जामगांव बु) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

कै.नागराज (मारुती) त्रिंबक पाटील(मा.सरपंच जामगांव बु) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम संपन्न..

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ( मोहोळ) : स्वर्गीय नागराज (मारुती) त्रिंबक पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण आज पाटील वस्ती जामगांव बु येथे पार पडले. याप्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. वासकर महाराज यांच्या हरिकिर्तना नंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.तसेच भव्य रक्तदान शिबीर , ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप , शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज (दादा) डोंगरे , जि.प. सदस्या शैलजा ताई गोडसे , मिरी चे माजी सरपंच रफिक पटेल , बेगमपुर चे सादिक भाई तांबोळी, जकराया कारखान्याचे एम.डी. सचिन जाधव , माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील , कोरवली चे सरपंच पाटील , उपसरपंच कस्तुरे , डॉ . अमोल पाटील , सिद्धाराम म्हमाणे , कामती खुर्द चे माजी सरपंच सुभाष आण्णा पाटील , युवा नेते संजय पाटील , जामगांव खुर्द चे सरपंच मौला भाई अत्तार, माजी सरपंच भागवत आण्णा साठे , नागेश साठे मालक , जामगांव बु चे माजी पंचायत समिती सदस्य मारुती (आण्णा) कदम , माजी सरपंच बाळासाहेब डांगे , आण्णासाहेब हाके , गहिनीनाथ जाधव, आबा सातपुते , अमोगसिदध डांगे , नागेश सातपुते, महादेव सलगर , आण्णा थोरबोले , नाना हाके , संदेश कुलकर्णी, कृष्णा घंटे , लक्ष्मण डवले , बापु बेलछत्रे, अंबादास ननवरे , देविदास ननवरे , सचिन गुजरे , विजयराज प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते , निलेश (भैया) पाटील मित्र परिवार , महादेव भजनी मंडळ , पाटील परिवार तसेच स्व.नागराज पाटील कुटुंबावर प्रेम करणारे पंचक्रोशीतील शेकडो नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads