महाराष्ट्र
गुंजेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चौकशीचे आदेश..
सोलापूर ( मंद्रूप) : गुंजेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदाकडून दक्षिण सोलापूर तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
सदर तक्रार अर्जात गुंजेगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या संस्थेचे सचिव सलिम शेख यांना अनेकवेळा कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली,परंतु प्रत्येक वेळी देतो म्हणून त्यांनी टाळाटाळ केला,स्वतःचा फोन बंद ठेवणे,फोन न उचलणे,मी बाहेरगावी आहे अशी कारणे वारंवार सांगून सदर कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली.शेतकरी कर्जमाफीतही बराच घोळ घालून अध्यक्ष आणि सचिव यांनी संगनमताने संस्थेची आर्थिक लूट करुन फसवणुक केली आहे.आँडीट रिपोर्टमध्येही ब-याच अनियमतता व नियमाप्रमाणे कामकाज केले नसल्याचा उल्लेख आहे.नवीन सभासद घेतांना व जुने सभासद वगळतांना कोणत्या नियमाच्या आधारे हे सर्व केले ? ऑडीट रिपोर्ट मध्ये अशा अनेक त्रुटींचा उल्लेख केला आहे.
२०२२ च्या विविध कार्यकारी सोसायटीची मतदार यादी गावामध्ये चावडीवर ग्रामपंचायतीमध्ये न डकवता रात्रीच्या वेळी कोणाकडे तरी देऊन जायचे,जेणेकरुन कोणीही भेटणार नाही.सभासदांना अद्याप मतदार यादी देखील मिळालेली नाही.
सध्या गुंजेगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक प्रक्रिया चालु असुन त्यात सभासदांना भाग घेता येऊ नये म्हणून सचिव जाणीवपुर्वक कागदपत्रासाठी वारंवार टाळाटाळ करीत आहेत.तरी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी,असा तक्रारी अर्जात उल्लेख करण्यात आला आहे.
त्यास अनुसरून सहाय्यक निबंधक
सहकारी संस्था.तालुका दक्षिण सोलापूर यांनी संस्थेचे सचिव सलिम शेख यांना वरील विषयाच्या अनुषंगाने त्यांना कळवले आहे की,
गुंजेगांव वि.का.सेवा सहकारी सोसायटी गुंजेगांव या संस्थेचा पदभार आपणाकडे आहे. सदर संस्थेचे सभासद विकास सोपान साळुके व ज्ञानेश्वर सोपान साळुके यांनी बऱ्याच वेळेस संस्थेची माहिती मागणी करुनही माहिती देत नसल्याबाबत तक्रार या कार्यालयाकडे संदर्भिय पत्रान्वये केली आहे. तरी सदर अर्जाबाबत उचित ती कार्यवाही करुन संबंधीत सभासदांना संस्थेकडील उपलब्ध असलेली माहिती द्यावी. असे सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा