महाराष्ट्र
कु.अन्वी हिने आपला ७ वा वाढदिवस केला सामाजिक कार्याने साजरा....
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : एम के फाऊंडेशन सोलापुर च्या वार्षिक कॅलेंडर मध्ये फाऊंडेशन च्या वतीने निराधार वयोवृद्धांना अन्नतृप्ती योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जेवणाच्या डब्याचे वाटप करतानाचे छायाचित्र काही महिन्यापूर्वी तिने पहिले व त्यांनी त्याविषयी विचारले, तिला त्याची माहिती सांगितली असता तिने जमा करत असलेला पैश्याचा गल्ला ह्या कार्यासाठी देईन असे सांगितले. अन्वीने तीच्या वाढदिवसाच्या दिवशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे जी यांच्याकडे पैश्याचा गल्ला सुपूर्द केला.
यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे म्हणाले कि, एम.के.फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल निरागस लहान मुले सुद्धा घेत आहेत, यामुळे नक्कीच आम्हाला काम करण्यास प्रेरणा मिळते. आजकालची मुले ही मोबाईलमध्ये अडकले आहेत. बाहेरच्या जगाविषयी त्यांना काहीच माहिती नसते, समाजकार्याचे बाळकडू मुलात लहान वयातच रुजवावे लागते. पण सध्या तसे होताना दिसत नाही. याबाबत पालक जागृत होणे गरजेचे आहे. कु.अन्वी ही अपवाद आहे.तिची समाजाविषयी तळमळ खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. कु.अन्वीचा आदर्श इतर मुलांना घ्यावा असे आवाहन एम के फाऊंडेशन संस्थापक श्री.महादेव कोगनुरे केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा