नोकरीविषयक
NSFU Recruitment 2022 : टीचिंग आणि नॉन टीचिंग पदांसाठी 300 जागांवर भरती; कसा कराल अर्ज?
नॅशनल फॉरेंसिक सायन्सेज युनिवर्सिटी (National Forensic Sciences University,NSFU) ने विविध शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट career.nfsu.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 3 मेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मे 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 332 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा, त्यानंतर आलेला कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही, असं युनिवर्सिटीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
रिक्त जागांचे तपशील
भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, याद्वारे एकूण 332 पदं भरली जातील. ज्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 193 पदांचा समावेश आहे आणि विभाग अधिकारी, सहाय्यक निबंधक आणि इतर 139 पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
नॅशनल फॉरेंसिक सायन्सेज युनिवर्सिटी भरती अंतर्गत, अध्यापन पदं आणि शिक्षकेतर पदांसाठी भिन्न शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली आहे. अध्यापन आणि अशैक्षणिक पदांसाठी शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा.
अर्ज शुल्क
नॅशनल फॉरेंसिक सायन्सेज युनिवर्सिटी भरती अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 500 रुपये शुल्क जमा करावं लागेल. ज्याचं पेमेंट ऑनलाइन पद्धतीनं करता येणार आहे. दरम्यान, SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा