एम.के.फाउंडेशनच्या वतीने कारकल येथील कुटुंबाला संसार उपयोगी साहित्यांची मदत... आत्ता पर्यंत जिल्ह्यातील आठ जळीतग्रस्त कुटुंबाना मदतीचा हात... - दैनिक शिवस्वराज्य

एम.के.फाउंडेशनच्या वतीने कारकल येथील कुटुंबाला संसार उपयोगी साहित्यांची मदत... आत्ता पर्यंत जिल्ह्यातील आठ जळीतग्रस्त कुटुंबाना मदतीचा हात...


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
द.सोलापूर (मंद्रूप) दि.११ :- द.सोलापूर तालुक्यातील कारकल येथील मल्लम्मा कोळी यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले. अनेक किमती वस्तू भस्मसात झाल्या.दरम्यान याची माहिती सरपंच अमोगसिद्ध देशमुख व समाजसेवक दादा मेटगार यांनी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे यांना दिली होती. त्या अनुषंगाने आज पीडित कुटुंबाला फाउंडेशनच्या वतीने संसार उपयोगी साहित्यांची मदत करण्यात आली. 

        कारकल येथील जळीतग्रस्तांना मदत करून एम.के.फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आत्ता पर्यंत जिल्ह्यातील आठ जळीत कुटुंबाना फाउंडेशनच्या वतीने मदत करण्यात आल्याची माहिती संस्थापक महादेवजी कोगनुरे यांनी दिली.

       जळीत ग्रस्तांच्या वेदना भयंकर असतात. संपूर्ण घर आणि संसार उद्वस्थ झालेलं असतं. संसार पुन्हा उभी करण्याची आव्हान कुटुंबासमोर असते. अश्या अडचणीत असणाऱ्या जळीत कुटुंबाच्या मदतीला आमची फाउंडेशन नेहमी तत्पर असते. घटनास्थळी कोणतीही जीवित हानी झाली नाही, याचे समाधान असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे यांनी व्यक्त केले.

         यावेळी संस्थापक महादेवजी कोगनुरे, राधाकृष्ण पाटील, श्रीशैल चडचणे,अनिल कापसे,सरपंच अमोगसिद्ध देशमुख, प्रकाश गुड्डेवाडी,उपसरपंच सिद्धप्पा हंजगी, ग्रा. पं सदस्य चंद्रकांत गुड्डेवाडी,श्रीशैल गुड्डेवाडी,रामचंद्र पाटील,श्रीशैल गत्ते,मलकारी देशमुख,अंबादास काटकर, पोलीस पाटील तुकाराम काटकर, रामचंद्र पाटील, वीरभद्र स्वामी, वासुदेव कोळी,लाला मुल्ला, इरेश बिराजदार, ओंकार स्वामी,श्रीशैल नाव्ही आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads