राहुल गोसावी व रितेश जाधव या दोघांचा गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून यथोचित सत्कार व सन्मान.. - दैनिक शिवस्वराज्य

राहुल गोसावी व रितेश जाधव या दोघांचा गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून यथोचित सत्कार व सन्मान..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : गुंजेगाव ता.द.सोलापूर येथील राहुल गोसावी यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अमेरिकेच्या शोर लाईन कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल व रितेश जाधव याने कॉम्प्युटर इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षात 87 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केल्या बद्दल या दोघांचाही गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

 मेजर रामचंद्र गोसावी यांचे चिरंजीव राहुल गोसावी यांची बी टेकच्या तिसऱ्या वर्षाला असतानाा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अमेरिकेच्या शोर लाईन कंपनीमध्ये निवड झाली आहे त्याच्या यशात त्याचे आई-वडील ,भाऊ यांचा वाटा आहे. राहुल गोसावी यांचा सत्कार तंटामुक्त अध्यक्ष सुभाष भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच समाधान जाधव यांचे चिरंजीव रितेश जाधव याने कॉम्प्युटर इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षात 87 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले त्यांचा सत्कार उत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यासाठी या दोघांचाही गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला .
तसेच यावेळी मेजर रामचंद्र गोसावी यांचे चिरंजीव सचिन गोसावी यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

 यावेळी ग्रामसेवक दयानंद पाटील, उपसरपंच तुकाराम भडकुंबे, ज्ञानेश्वर साळुंके, शंकर पवार, उत्तम जाधव, कुंडलिक जाधव, संतोष मोटे, किरण आठवले, सत्यवान भडकुंबे, डीएम ग्रुप चे अध्यक्ष विकास पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार, दत्ता पवार, अमीर शेख,मेजर शरणाप्पा कोरे, मेजर रामचंद्र गोसावी, अंगद पवार, गणपत पवार, मेजर किसन पाटील, शहाजी पाटील, समाधान जाधव, समाधान पवार, नागेश गुंड, अरविंद आवताडे,संतोष गवळी,विनोद कोरे,युवराज पवार, बाजीराव एडके, नवनाथ एडके, आनंद आठवले,भारत भडकुंबे, देविदास भडकुंबे, सचिन गोसावी, आयुब मुजावर, जिलानी मुजावर, दत्तात्रेय लोणारी, माऊली सुतार, शेखर जाधव, महादेव अवताडे, शिवाप्पा लोणारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads