महाराष्ट्र
मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठन नवी दिल्लीचे मुंबई येथे बैठकीचे आयोजन..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना नवी दिल्ली बैठकीचे व महाराष्ट्र कार्यकारिणी मेळावा आणि नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील हॉटेल गार्डन येथे उत्साहात संपन्न झाला.
राष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. एम.शेख यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय महासचिव अस्लम सिद्दीकी, राष्ट्रीय महिला राबिया सय्यद उपाध्यक्ष,राष्ट्रीय कोषाध्यक्ष देवेन झा , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मांदीप सिंग,महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रेखा पाटील , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल धायगोडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष समीर शेख, सोलापूर जिल्हा महासचिव विठ्ठल मुंगपाटील , सोलापूर जिल्हा मीडिया प्रमुख विजयजी लोंढे,सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष मालनबी शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व आयडेंटी कार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या कामाचा आढावा दिला. यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नवी मुंबई, मुंबई, उस्मानाबाद, अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व त्यांना नियुक्तीपत्र व आयडेंटी कार्ड वाटप करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यकारिणी मेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सुभाष भोसले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांनी मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा