आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत क्रांती दिनानिमित्त लोकसेवा विद्या मंदिर मंद्रूप प्रशालेत माजी सैनिकांचा सत्कार.. क्रांती दिनानिमित्त प्रशालेच्या वतीने गावातून हर घर तिरंगा जनजागृती रॅली.. - दैनिक शिवस्वराज्य

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत क्रांती दिनानिमित्त लोकसेवा विद्या मंदिर मंद्रूप प्रशालेत माजी सैनिकांचा सत्कार.. क्रांती दिनानिमित्त प्रशालेच्या वतीने गावातून हर घर तिरंगा जनजागृती रॅली..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव कार्यक्रमास मुख्याध्यापक श्रीधर टेळे सर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
      शासनाच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध उपक्रमा अंतर्गत प्रथमत: 9 ऑगस्ट क्रांती दिन निमित्ताने प्रशाला व कॉलेजच्या वतीने गावातून हर घर तिरंगा, घर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आले त्यानंतर देशसेवेसाठी योगदान दिलेल्या सुभेदार मल्लाप्पा बाळगे, नायक मल्लेशा पुजारी, हवालदार म्हाळप्पा हेळकर, हवालदार तुकाराम राठोड, हवालदार अविनाश बाबर, हवालदार रेवणसिद्ध कुमठेकर, नायक मलकारी कामगोंडे, हवालदार चंद्रकांत हेळकर, हवालदार भाऊसिंग पवार, नायक शिवराया पाटील, सुभेदार भारत देशमाने, हवालदार रेवणसिद्ध ख्याडे, नायब सुभेदार श्रीमंत शिवशरण, मेजर बाळासाहेब घाडगे या माजी सैनिकांचे सत्कार सन्मान करून वातावरण देश प्रेमाने भारावून जाण्यासाठी देशभक्ती गीत घेण्यात आले.
      यावेळी माजी सैनिकांनी आपल्या मनोगतात मुलींनाही सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्याची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी देखील देशभक्ती निर्माण करण्यासाठी घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येकांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकविण्याचे निवेदन केले.
        यावेळी विद्यार्थी ,शिक्षक, पालक, माजी सैनिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी उत्साहात सामूहिकपणे राष्ट्रगीत गायन केले. नंतर उत्तराखंड येथे राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थिनी खेळाडूंचे गौरव करण्यात आले. तनुजा पवार,तनुष्का पवार, साक्षी राठोड या यशस्वी तायक्वांदो खेळाडूंचे मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धे करिता निवड झाली आहे.
       या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्रीधर टेळे सर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी सर, मंद्रूपचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे, शिवपुत्र जोडमोठे, इरेश उंबरजे, अमोल बाळगी, ज्येष्ठ प्राध्यापक नारायण कुलकर्णी सर, क्रीडा विभाग प्रमुख नागनाथ धनाळे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार टेळे सर आदी उपस्थित होते.
     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवपुत्र म्हेत्रे सर, सतीश जकुणे सर, सोम शंकर म्हेत्रे सर, राहुल मठपती सर, बोर्डिंग अधीक्षक श्रीशैल म्हेत्रे सर, रमेश व्हनमाने सर समस्त शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुतार सर व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य बसप्पा घाटे सर यांनी केले
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads