सलगर वस्ती येथील जळीतग्रस्त कुटुंबीयास एम.के.फाउंडेशन कडून मदत... संवेदनशील सामाजिक संस्था म्हणजे एम.के.फाउंडेशन : माधव रेड्डी - दैनिक शिवस्वराज्य

सलगर वस्ती येथील जळीतग्रस्त कुटुंबीयास एम.के.फाउंडेशन कडून मदत... संवेदनशील सामाजिक संस्था म्हणजे एम.के.फाउंडेशन : माधव रेड्डी



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
सोलापूर : मानवतेच्या दृष्टीकोनातून एम.के.फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. सोलापूर जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करणारी संवेदनशील संस्था म्हणजे एम.के.फाउंडेशन असल्याचे गौरवोद्गार सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी काढले.

सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक कारणाने गुलनाज शेख या महिलेचे घर जाळण्यात आले. दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेची घर जळण्याने संसार उघड्यावर आले. अश्या गरीब कुटुंबाना मदत करण्याची विनंती सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी एम.के.फाउंडेशन संस्थापक महादेव कोगनुरे यांच्याकडे केले असता,माधव रेड्डी यांच्या विनंतीला मान देऊन आज एम.के.फाउंडेशनच्या वतीने जळीतग्रस्त कुटुंबीयांस संसार उपयोगी साहित्यांची मदत करण्यात आली, त्या प्रसंगी श्री. रेड्डी बोलत होते.

पुढे बोलताना माधव रेड्डी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना एखादा कुटुंब उघड्यावर राहणे योग्य नाही, पोलीस हे घटनेच्या चौकशी करण्यासाठी आहेतचं,सोबत गरजू लोकांच्या सेवेसाठी सुद्धा तत्पर असतात. या मदतीच्या माध्यमातून सोलापूर शहर पोलीस आणि एम.के.फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही माणुसकीची पूजा केली,असे प्रतिपादन केले.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी,संस्थापक महादेव कोगनुरे, सलगर वस्ती पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले,रॉकी बंगाळे, सोमनाथ होसाळे, श्रीशैल चडचणे, मनोज कोराळे,पोलीस नाईक कदम, पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड, शिवाजी राठोड, कल्लप्पा आहेरवाडी, धुळप्पा आळंद, शिवलाल हरळेकर, मल्लिकार्जुन दारफळे,अजित पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------
जळीत कुटुंबाच्या मदतीसाठी फाउंडेशन नेहमी तत्पर असते. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ कुटुंबांना आम्ही संसार उपयोगी साहित्यांची मदत केली. सलगर वस्ती येथील जळीतग्रस्त कुटुंबाला मदत करण्याची संधी माधव रेड्डी साहेबांनी दिली. शेख कुटुंबाला पुन्हा पुन्हा नव्याने संसार उभी करण्याची आमची छोटीशी मदत होईल. एकमेकांना सहकार्य करणे हीच माणुसकी आहे, ती एम.के फाउंडेशनकडून आम्ही जपतोय.
                                                          - महादेव कोगनुरे 
                                           संस्थापक एम के फाउंडेशन सोलापूर
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads