माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेनेच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी श्री . अजय चौधरी यांची निवड
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु. एन. न्यूज २४ संलग्न माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी जामनेर येथील श्री अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, आपली सामाजिक क्षेत्रातील कार्यप्रणाली पाहून आपणास माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आपण सामाजिक कार्यात माहिती अधिकार, पत्रकारिता व पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून तसेच समाजातील विविध घटकांचे प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडवण्याचे व या संघटनेची विचारधारा यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवीत असून आपली गुणवत्ता, कार्यक्षमता व संघटनेची बांधणी याचा विचार करून संघटनेच्या नियमांचे पालन करून कायदे व भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न व न्याय हक्कासाठी बांधील राहाल हीच अपेक्षा.माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी अजयभाऊ चौधरी यांची निवड झाल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल अजय चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा