अंत्रोळी येथील जिव्हाळा शेतकी कर्मशाळा संस्थेच्या वतीने विधवा व ज्येष्ठ महिलांना दिवाळी फराळीचे किट वाटप.. - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी येथील जिव्हाळा शेतकी कर्मशाळा संस्थेच्या वतीने विधवा व ज्येष्ठ महिलांना दिवाळी फराळीचे किट वाटप..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील जिव्हाळा (प्रौढ मतिमंद मुलांची) शेतकी कर्मशाळा संस्थेच्या वतीने संस्थेचे विस्वस्थ डॉ. विलास भालगावकर यांच्या हस्ते 15 ज्येष्ठ महिलांना व सक्षम (विधवा) महिलांना दिपावली निमित्त दिपावली फराळ किट वाटप करण्यात आले. व तसेच चेअरमन समर्थक ग्रुप यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला
    या दिपावली फराळ किटमध्ये दोन किलो शेंगा, दोन किलो रवा, दोन किलो मैदा, दोन किलो साखर, दोन किलो तेल, साबण, दोन किलो चिवडा, पोहे, उठणे, सुगंधी तेल, साडी, ईत्यादी वस्तु देण्यात आल्या. 
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर , जिव्हाळा संस्थेचे विस्वस्थ डॉ. विलास भालगावकर यांचा ग्रामस्थांकडून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान व सत्कार करण्यात आला.
    यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष गजीनाथ शेजाळ, ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव सलगरे, इनुस शेख, उपसरपंच खरात, बाबा बंडगर, गणेश कुंभार, सरफराज शेख, अजय कर्वे, नानासाहेब करपे, चंद्रकांत कोकरे, नाथाजी केंगार, प्रकाश कोकरे सर, दावल शेख, सोनकवडे सर ,रावसाहेब महिमकर ,भाऊराया बेलदार ,आप्पासाहेब सलगरे, नागनाथ कोळी, समाधान शिंगण महाराज, रमेश सुरवसे, कल्पना सोनकवडे, लक्ष्मी करपे, सागर कर्वे, राम कर्वे, रोहन गावडे व जिव्हाळा शेतकी कर्मशाळा संस्थेचे सर्व कर्मचारीवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads