महाराष्ट्र
मा.आमदार दिलीपरावजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजेगाव अकोले मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या मागणीला आले यश..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : माजी आमदार दिलीपरावजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली व डी.एम ग्रुपचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुंजेगाव, अकोले मंद्रूप येथील नुकसानग्रस्त रब्बी पिकाचे नुकसान भरपाई पंचनाम्याच्या पाठपुराव्यास यश आले व जुन ते ऑक्टोबर पर्यंत झालेेल्या अतिवृष्टीमुुुळे तुुर, शेंगा, कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पिकाचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त फळबाग व उर्वरित खरीप पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निवेदन मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आले.
सध्यावे कृषी अधिकारी पाटील हे ट्रेनिंग्साठी पुणे येथे गेल्याने तालुका कृषी अधिकारी माळी यांनी उमेश कोळी यांची गुंजेगाव ,अकोले मंद्रूप गावासाठी नूतन कृषी सहाय्यक म्हणून नुमणूक करून पंचनामा करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.
गुंजेगाव व अकोले मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असुन सर्व गुंजेगाव व अकोले मंद्रूपच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचे आभार मानले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार, ज्ञानेश्वर साळुंके, दत्ता पवार, कुंडलिक जाधव, दीपक हजारे, एकनाथ साळुंके, लक्ष्मण पाटील , संभाजी एडके, नवनाथ एडके, परमेश्वर एडके, युवराज पवार, तुषार पवार, संभाजी पवार, भागवत पवार, दादा जाधव, मिलिंद माने तसेच गुंजेगाव अकोले येथील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा