Job Alert | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रांमध्ये 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील मिळत आहे.
अभियंता पदांच्या एकूण 330 जागा
महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या जागांसाठी पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता पदांच्या रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्यामार्फत विविध अभियंता पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पात्रधारक उमेदवारांनी mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती तपासावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या पदांसाठी 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा