भंडारकवठे येथे क्रांतीवीर किसान सेनेच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

भंडारकवठे येथे क्रांतीवीर किसान सेनेच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा संपन्न..


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : सदक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे क्रांतीवीर किसान सेनेच्या वतीने आज गुरुवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येंने उपस्थित होते.यावेळी क्रातीवीर किसान सेनेच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
    अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत शेतकरी खात्यात जमा करावी.सर्व ऊस कारखाने यांनी उसाचा दर ३ हजार रुपये टन जाहिर करुन सदरची ऊस बिले रक्कम १५ दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी.शेतक-यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम जमा करावी.सर्व साखर कारखान्यात असणारे वजन काटे यांची तपासणी केली पाहिजे.आदी मागण्यांचा त्वरीत मंजूर करण्याची मागणी यावेळी मेळाव्याद्वारे करण्यात आली.
 यावेळी क्रांतीवीर किसान सेनेचे  प्रदेशाध्यक्ष शेखर बंगाळे,जिल्हाध्यक्ष राज व्हनमाने यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
    यावेळी क्रांतीवीर किसान सेनेचे संस्थापक करण गडदे,प्रदेश अध्यक्ष शेखर बंगाळे,जिल्हाध्यक्ष राज व्हनमाने,मल्लेषा सुरवसे,प्रसन्न कोंडगीर स्वामी,सिद्ध पुजारी यांच्यासह शेतकरी बांधव बहुसंख्येंने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads