महाराष्ट्र
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. येत्या सोमवारी (दि.7 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हॉलमध्ये जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन/अर्ज, माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. नागरिकांच्या लोकशाही दिनातील अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा