महाराष्ट्र
अक्कलकोट येथे 22 जुलै रोजी मतिमंद व गतीमंद मुलासाठी मोफत होमिओपॅथिक शिबीराचे आयोजन...
समीर शेख प्रतिनिधी
अक्कलकोट : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाउंडेशन (प्रिडक्टिव्ह होमिओपॅथी ) यांच्या संयुक्त विद्यमाने होप फॉर होपलेस हे मतिमंद व गतीमंद मुलासाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर दिनांक 22 जुलै 2023 रोजी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भक्तनिवास समोर, अक्कलकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिरामध्ये गतिमंद, मतिमंद,कर्णबधिर, मूकबधिर,शारीरिक व्यंग, मानसिक व्यंग असणाऱ्या मुलांवर मोफत होमिओपॅथिक उपचार केले जाणार आहेत.
सदर होमिओपॅथिक शिबिर हे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना सोयीस्कर व्हावे या दृष्टिकोनातून मुंबई येथील डॉक्टरांचे पथक हे अक्कलकोट येथे येणार आहे. यापूर्वी तीन वेळा अक्कलकोट येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी रुग्णांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. तरी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर प्रमुख डॉक्टर अर्पणा सामल यांनी केले आहे.तसेच शिबिरा बाबत कोणास माहिती हवी असल्यास मदत क्रमांक 7039160039 व डॉ. अर्पणा समाल यांचे मोबाईल क्रमांक 7499788400 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा