महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातीलकोतवाल पदाचे आरक्षण निश्चित...
समीर शेख प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातील कोतवाल पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सन 2023 मध्ये करण्यात येणाऱ्या कोतवाल भरती आरक्षण सोडत 20 जुलै रोजी मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर या ठिकाणी स.११-०० वा.संपन्न झाला. कोतवाल या पदासाठी मागासवर्गीय कक्ष,पूणे यांचे मंजूर बिंदुनामावलीनुसार 9 पदे रिक्त होते. शासन निर्णय नुसार 9 पदाच्या 80 टक्के प्रमाणे एकूण 7 कोतवाल पदाची प्रवर्गनिहात आरक्षण सोडत काढण्यात आले.
यावेळी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष मनीषा आव्हाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर क्रं.२, राजशेखर लिंबारे सदस्य सचिव तथा तहसिलदार दक्षिण सोलापूर, आर.बी. भंडारे निवासी नायब तहसिलदार,डि.एफ. गायकवाड,महसूल नायब तहसिलदार, विठ्ठल बी.जाधव निवडणूक नायब तहसिलदार, आरती दबाडे संजय गांधी नायब तहसिलदार,किरण फुले, परिविक्षाधीन नायब तहसिलदार, अव्वल कारकून पुरुषोत्तम शिंदे तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
या कोतवाल भरती प्रक्रियेत वळसंग (अनुसूचित जाती महिला), वडकबाळ (अनुसूचित जमाती), मुस्ती (भटक्या जमाती ब), हत्तुर (भटक्या जमाती ड), बोरामणी (इतर मागास प्रवर्ग), तोगराळी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) सिंदखेड (अनुसूचित जमाती महिला) असे आरक्षण निश्चित झाले असून लवकरच या पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा