महाराष्ट्र
अंत्रोळी येथे सोलापूर सोशल फाऊंडेशन व जिव्हाळा शेतकी कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम समृद्धी कार्यशाळेचे आयोजन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे रविवार दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सोलापूर सोशल फाऊंडेशन व जिव्हाळा शेतकी कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम समृद्धी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि कार्यशाळा सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष , आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या ग्राम समृद्धी कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. रमेश जारे संचालक टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, रूरल डेव्हलपमेंट, तुळजापूर व मोहनराव अनपट समृद्ध गाव अभियान जिल्हा समिती प्रमुख यांची व मनोज शहा कृषीतज्ज्ञ मयुरी वाघमारे-शिवगुंडे
संचालिका, सोलापूर सोशल फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील संरपच व ग्राम विकासात कार्यरत असलेले स्वयंसेवक यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन जिव्हाळा शेतकी कर्मशाळा संस्थेचे विश्वस्त डॉ. विलास बालगावकर व विजय पाटील मुख्य समन्वयक सोलापूर सोशल फाउंडेशन
यांनी केले आहे तरी संरपच यांना
कार्यशाळेस सहभागी होण्यासाठी जिव्हाळा शेतकी कर्मशाळा संस्थेचे विश्वस्त डॉ. विलास बालगावकर यांनी आवाहन केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा