जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर तालुक्यातील फत्तेपुर  पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची वाढ झाली आहे. अवैध व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात चिरी मिरी घेऊन गुटखा, गांजा, जुगार, मटका, ताडी,अवैद्य देशी विदेशी दारू, हात भट्टी, कोणाच्या  आशीर्वादाने सुरु  असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणत सुरू आहे.फत्तेपुर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात गुटखा, गांजा, जुगार, मटका, ताडी,अवैद्य देशी विदेशी दारू, हात भट्टी, मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे .परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.  
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री देखील जोरात चालू असून पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक हातभट्ट्या देखील राजरोस पणे सुरू आहेत. परिसरातील हॉटेल व धाब्यावरती जुजबी कारवाई 
अवैध दारू विक्री करणारे तसेच ढाबे, हॉटेलवर विना परवाना दारू विकणारे व्यवसायिक यांच्यावर कोणतीही कारवाई होणारं नाही असे छातीठोक पणें सांगितले जाते.कारण वसुली बहाद्दरच्या माध्यमातुन फत्तेपुर पोलीसांना महिन्याला मोठा मलिदा देत असल्याची माहिती एका हॉटेल चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हे सर्व अवैध धंदे बंद होतील का सर्वसामान्य जनतेला प्रश्न निर्माण झाला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads