मराठा आंदोलनाचे नेते श्री. मनोज जरांगे यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट
मराठा आंदोलनाचे नेते श्री. मनोज जरांगे यांची आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारचे सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न यावेळी गिरीश महाजन यांनी मांडले. जुन्या कुणबी नोंदी शोधण्याबाबत प्रशासकीय पातळीवर वेगाने कामकाज सुरू असून आतापर्यंत ५४ लाख नोंदी आढळून आल्या आहेत ही वस्तुस्थिती सांगितली.
मराठा समाजाला न्यायालयीन कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मराठा समाजानेही सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ द्यावी अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा