लोकनेते डी.एन.गायकवाड माध्यमिक विद्यालय बक्षीहिप्परगे येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

लोकनेते डी.एन.गायकवाड माध्यमिक विद्यालय बक्षीहिप्परगे येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कपिल शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ, बक्षीहिप्परगे संचालित लोकनेते डी.एन.गायकवाड माध्यमिक विद्यालय बक्षीहिप्परगे या विद्यालयात दिनांक १८ डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले.
   या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सत्यजित आवटे उपस्थित होते.प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
   याप्रसंगी बोलताना सत्यजित आवटे यांनी प्रथमता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे सदृढ असतात व खेळामुळे मेंदू व मनगटाचा सर्वांगीण विकास कसा होतो हे सांगितले. प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष 
ॲड स्वप्निल डी. एन.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. 
    या कार्यक्रमास माजी सरपंच सीताराम राठोड, उपसरपंच मनोज महाडिक, लोकनेते डी.एन.गायकवाड स्मारक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब माने, प्रशालेच्या मुख्याध्यापिका कांचन गायकवाड तसेच क्रीडा शिक्षक किसन लोटे , शामसुंदर गायकवाड व ग्रामस्थ विश्वास निकंबे, विलास दुपारगुडे , कोंडीबा दुपारगुडे, रामचंद्र सलवदे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक योगिनाथ जोकारे यांनी केले तर आभार सहशिक्षक संपतराव नाईकवाडे यांनी मानले.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads