जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बू येथील पत्रकाराच्या मुलावर तलवारीने हल्ला...
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथील पत्रकार बाळू पाटील, यांचे चिरंजीव श्री तुषार पाटील यांच्यावर 25 डिसेंबर रोजी रात्री सात ते साडेसात वाजता दरम्यान दोन अज्ञात व्यक्तीने तलवारी, चापर ने वार केल्याची घटना घडली आहे. त्याच बरोबर दोन्ही अज्ञातांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जामनेर तालुक्यातील गुंडाराज दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र दहशती चे वातावरण पसरत आहे. सदर हल्याचा प्रकार हा चक्क पत्रकाराच्या च मुलावर च झाल्याने लोकशाही चौथा स्तंभ यावर च जणूकाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात तुषार पाटील हा नुकत्याच एल आय सी पॉलिसीत जळगाव जिल्ह्यातील अग्रस्थानी मान पटकवल्याने ही काहींच्या जिव्हारी लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसा तुषार पाटील यास फोन द्वारे ही धमक्या या दोन दिवसात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने तुषार वर हा प्राण घातक हल्ला झाल्याचे आढळून येत आहे. तरी जामनेर पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अश्या दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जामनेर यांच्याकडून मागणी होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा