टाटा कंपनीचे डंपर बनावट कागदपत्रांच्या सहायाने परिवहन कार्यालयात नोंदणी करून विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड ; गुन्हे शाखा कक्ष-४, मुंबई ची धडाकेबाज कारवाई... - दैनिक शिवस्वराज्य

टाटा कंपनीचे डंपर बनावट कागदपत्रांच्या सहायाने परिवहन कार्यालयात नोंदणी करून विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड ; गुन्हे शाखा कक्ष-४, मुंबई ची धडाकेबाज कारवाई...


समीर शेख प्रतिनिधी
 मुंबई : कक्ष- ४ गुन्हे शाखेस गोपनीय बातमी मिळाली होती की, जोगेश्वरी (प) येथे राहणारा एक इसम हा गेले दोन, तिन वर्षापासून कागदपत्रांचीं मुदत संपलेल्या, मुंबई शहरामध्ये वापर करू शकत नाही असे डंपर कमी भावामध्ये विकत घेवून मुंबई मधील विविध गॅरेंजमध्ये नेवून बॉडीमध्ये बदल करून त्या डंपरवर बनावट इंजिन व चेसीस नंबर पंचिंग करून त्या बनावट इंजिन नंबर व चेसीस नंबरची अरुनाचल प्रदेश येथील आर.टी.ओ. मधून एन.ओ.सी. प्राप्त करून विरार / वसई परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी करुन, आर.टी.ओ. विरार / वसईचा नोंदणी क्रमांक प्राप्त करून गरजुंना १२ ते १५ लाखामध्ये विक्री करीत आहे.
सदर बातमीची शहानिशा केली असता, जोगेश्वरी, मुंबई येथे राहणा-या दोन आरोपीत इसमांच्यां ताब्यात ०३ डंपर मिळून आले. त्यांच्याकडे त्यांनी ते डंपर कोठून खरेदी केले. त्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी सदरचे डंपर स्क्रॅपमधून कळंबोली येथून विकत घेवून त्यामध्ये त्यांचा ओडीसा राज्यातील साथीदार याच्या मदतीने बनावट इंजिन नंबर व चेसीस नंबरची प्लेट व अरुनाचल प्रदेश आर. टी.ओ. येथील एन.ओ.सी. कुरीयरद्वारे प्राप्त करुन आणखी एक साथीदार रा. ठि. विजयवाडा, हैद्राबाद यास मुंबईमध्ये बोलावून स्थानिक गॅरेजमध्ये जुन्या डंपरची चेसीस नंबर व इंजिन नंबरची प्लेट बदलून बनावट इंजिन व चेसीस नंबर पंचिंग करीत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहिती वरुन त्यांनी कळंबोली येथील ज्या लोकांकडुन जुने डंपर विकत घेतले त्या इसमांकडे चौकशी करण्यात आली व वर नमुद इसमांकडून ताब्यात घेण्यात आलेले डंपर दाखविण्यात आले. त्यांनी सदर डंपरची पाहणी करून ओळखुन त्यांनी विकलेल्या डंपर वरील चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक मध्ये फेरफार केल्याचे सांगितले.
        सदर प्रकरणी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची खात्री झाल्याने तिचा छडा लावण्यासाठी सखोल तपास करण्याची आवश्यकता वाटल्याने शासनाच्या वतीने फिर्याद देवून गु.प्र.शा., गु.र.क्र. ८१ / २०२३, कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ ३४ भा.द.वि. अन्वये नोंद करून सदर गुन्हयामध्ये दोन इसमांना अटक करण्यात आली. अटक आरोपीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेश येथील परिवहन कार्यालयाची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या डंपरची एन. ओ. सी. प्राप्त करून, त्या आधारे वसई विरार परिवहन कार्यालयात डंपरची नोंदणी करुन, वसई विरार परिवहन कार्यालयाचे नोंदणीचा नवीन क्रमांक मिळवुन १२ ते १५ लाख रुपयांनां सदर डंपर गरजवंताना विकल्याचे व त्यांची आर्थीक फसवणूक केल्याचे तसेच शासनाची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले. आता पर्यंत अशा प्रकारचे १० डंपर अंदाजे किंमत १ कोटी २० लाख रुपये (१,२०,००,०००) तपासात जप्त करण्यात आले असुन आणखी डंपर जप्त करीत आहेत. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्याम इंजिन व चेसीसवर बनावट नंबर पंचिग करणाऱ्या इसमास तेलंगना राज्यातून अटक करण्यात आली आहे.
   अटक आरोपी सिकंदर झरील शाह वय ५० वर्षे , रमजान मेहबूब शेख वय - ३२ वर्षे, ॲनेग्यु श्रीनिवास जंग्गा रेड्डी वय - ५० वर्षे, हे तिन्ही अटक आरोपी  दि. २२/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
     सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह. आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मिना, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त डी (मध्य) दत्तात्रय नाळे, प्रभारी पोलीस निरीक्षक गु.प्र. शा, गु.अ.वि.,कक्ष-४, विलास भोसले, पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, शैलेश खेडकर, स.फौ. राजू सावंत, संजय परब, वशिष्ठ कोकणे, उत्तम बोटे, पो.ह. शरद शिंदे, प्रमोद मोरे, ज्ञानेश्वर मिंडे, विजय लहाने, संतोष कांबळे, पो. शि. तानाजी घेरडे, संजय गायकवाड, नानाभाऊ रोटे, अनिल पवार, प्रभाकर वाघ, पो. शि. चा. किरण चावरेकर, लखन चव्हाण व प्रसाद गरवड म.पो.ह. जोती शेटे, म. पो. शि. सुरेखा पाटील पथकाने केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads