जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर पंचायत समिती येथे आढावा बैठक - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर पंचायत समिती येथे आढावा बैठक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर  विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांना भेटी देऊन पाहणी केली. मतदानाचा टक्का आगामी निवडणूकीत वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
तसेच जिल्हाधिकारी यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बाबत जामनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्वतयारी कामकाजाचा आढावा घेऊन. सेक्टर व नोडल अधिकारी यांची बैठक घेतली. नगरपालिका व महसूल विषयक कामकाजाचा आढावा घेतला. जामनेर येथे भेटीदरम्यान नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या, अडचणी सोडविणेबाबत क्षेत्रीय अधिकारी यांना सूचना केल्या. जामनेर पंचायत समिती येथे पत्रकार परिषद घेऊन  निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, नगर पालिका मुख्यधिकारी नितीन बागुल,जामनेर तहसिलदार नानासाहेब आगळे,पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पुरवठा अधिकारी वैराळकर साहेब ,आर . डी.पाटील साहेब यांच्या सह सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads