मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने खो-खो स्पर्धा संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने खो-खो स्पर्धा संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर ग्रामीण व मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक २३ व २४ मार्च रोजी सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, दक्षिण सोलापूर तालुका खो-खो असोसिएशनचे सचिव तुळशिराम शेतसंदी यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावातील खेळाडूंसाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खो-खो स्पर्धेत मुले व मुली असे एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता.
     ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सपोनि प्रशांत हुले यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
या स्पर्धा पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सागर चव्हाण, मंहातेश मुळजे, माजीद शेख, संदीप काळे, मुख्याध्यापक अशोक लिगाडे, न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads