जामनेर भाजपा शहर उपाध्यक्षपदी फिरोज अली किफायत अली यांची निवड
जामनेर भाजपा शहर उपाध्यक्षपदी फिरोज अली किफायत अली यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन व तालुकाअध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांचे हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शिक्षणसंस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर,जिल्हा सरचिटणीस आतिश झाल्टे,जिल्हायुवक अध्यक्ष निलेश चव्हाण,शहर अध्यक्ष रवींद्र भाऊ झाल्टे,दीपक दादा तायडे,श्रीराम महाजन,सुभाष भाऊ पवार आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व जनेतच्या लहान मोठ्या अडी अडचणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करेल पक्ष संघटन साठी सदैव तत्पर राहील असे फिरोज अली यांनी पत्रकारांना सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा